Iron rod beating: हिंगोली जिल्ह्यातील कुडाळामध्ये सप्ताहाच्या पंगतीत वाढण नेण्याच्या कारणातून पाच जणांनी एका मुलावर लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांवर कुडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
पाच जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Iron rod beating) : वसमत तालुक्यातील कुडाळा येथे सप्ताहाच्या पंगतीतील वाढण नेण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणात हट्टा पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कुडाळा येथे सप्ताह आयोजित केला होता. या निमित्त सप्ताहाच्या सांगता प्रसंगी प्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील काशिनाथ चव्हाण यांचा मुलगा पंगतीत वाढत असताना वाढण नेण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाच जणांनी मुलास जीवे मारण्याच्या (Iron rod beating) उद्देशाने लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी झाला. यावेळी काशिनाथ चव्हाण हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
या (Iron rod beating) प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात काशिनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत आदिनाथ चव्हाण, ओमकार चव्हाण, भुजंग चव्हाण, विठ्ठल चव्हाण, शेषराव चव्हाण सर्व रा. कुडाळा यांच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे, युवराज गवळी हे करीत आहेत.