Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कोसमी–भटगाव मार्ग

कोसमी–भटगाव मार्गे कोटगुल रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप

Kosmi–Bhatgaon Road: कोसमी–भटगांवमार्गावरून कोटगुल जाणाऱ्या रस्त्याचा दुरुस्ता अत्यंत अडवला आहे. कामाचा प्रलंबित झाल्याने नागरिकांचा त्रास वाढत असतो, अपघाताची शक्यता


कोसमी–भटगाव मार्गे कोटगुल रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांचा संताप

Kosmi–Bhatgaon Road |

कोरची (Kosmi–Bhatgaon Road) : कोरची तालुक्यातील कोसमी–भटगांव मार्गे कोटगुल या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर असूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही काम रखडले असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.

या (Kosmi–Bhatgaon Road) प्रकरणी जबाबदार कोण—शासन की प्रशासकीय अधिकारी? असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तीन महिन्यांपासून काम प्रलंबित राहणे हे गंभीर दुर्लक्ष असून, याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) अधिकाऱ्यांवर असल्याचा आरोप होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे आदिवासी नेते मुकेश नरोटे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “काम मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सुरू होत नसेल, तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास येत्या काळात नागरिक रस्ता रोकोसारखे आंदोलन छेडतील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Related to this topic: