Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

या रस्त्याने का जातो म्हणत दोघांवर चाकू हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

“तु या रस्त्याने का आला, हा आमचा इलाका आहे, आम्ही पाथरीचे दादा आहोत,” असे म्हणत दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


या रस्त्याने का जातो म्हणत दोघांवर चाकू हल्ला तिघांविरोधात गुन्हा दाखल

Knife Attack |

पाथरी (Knife Attack) : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात “तु या रस्त्याने का आला, हा आमचा इलाका आहे, आम्ही पाथरीचे दादा आहोत,” असे म्हणत दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींनी उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून २३ मे रोजी पाथरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शरीफ अहमद यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे मावसभाऊ शेख लुकमान हे दुचाकीने जैतापूर मोहल्ला येथून तहसील कॉलनीकडे जात असताना पोस्ट ऑफिसजवळ आले असता ओळखीतील काही इसमांनी त्यांची दुचाकी अडविली.

यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. “तु या रस्त्याने का आला, आम्ही पाथरीचे दादा आहोत,” असे म्हणत आरोपींनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे मावसभाऊ जखमी झाले.

या प्रकरणी जुबेर जैदी, शेख आशफाक उर्फ आशू मॉडेल आणि अब्दुल रहेमान नासेर चाउस यांच्याविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: