Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

शेतकरी रास्ता रोको

कृषी दिनी शेतकऱ्यांचा एल्गार! कर्जमाफी, पीक विमा व हमीभावासाठी अमरावती–परतवाडा मार्गावर रास्ता रोको

Farmers Rasta Roko Andolan: कृषी दिनाच्या दिवशीच आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याने राज्य सरकारविरोधातील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला.


कृषी दिनी शेतकऱ्यांचा एल्गार कर्जमाफी पीक विमा व हमीभावासाठी अमरावती–परतवाडा मार्गावर रास्ता रोको

Farmers Rasta Roko Andolan |


सरकारविरोधात घोषणांचा कडकडाट; वाहतूक ठप्प, शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

अचलपूर (Farmers Rasta Roko Andolan) : कृषी दिनाच्या दिवशीच आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याने राज्य सरकारविरोधातील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला. लोक विकास संघटनेच्या वतीने अमरावती–परतवाडा मार्गावरील आसेगाव पूर्णा येथे बुधवारी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव आणि शेतीविषयक विविध मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. शेतकरी नेते गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लोक विकास संघटनेच्या (Farmers Rasta Roko Andolan) वतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विना अट, विना शर्थ सरसकट कर्जमाफी, सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी करणे, बियाणे व कृषी निविष्ठांच्या दरांवर नियंत्रण आणणे तसेच शेतीशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.

रास्ता रोको सुरू होताच अमरावती–परतवाडा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. "सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे!", "पीक विमा आमचा हक्क आहे!", "शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो!", "हमीभाव द्या, अन्यथा खुर्ची खाली करा!" अशा आक्रमक घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदविला. केवळ घोषणा आणि आश्वासनांच्या आधारावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसल्याचा आरोप करत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना शेतकरी नेते गोपाल भालेराव म्हणाले, "कृषी दिन हा शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस असताना आज त्याच शेतकऱ्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. तरीही सरकारला त्याचे काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत; मात्र मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल."
           
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Farmers Rasta Roko Andolan) काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

लोक विकास संघटनेने सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाभर आणि राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडली जातील. *"जय किसान, जय लोक विकास"*च्या घोषणांनी आंदोलनाची सांगता करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनात रमन लंगोटे, इरफान सौदागर, आकाश खेलदार, ऋषिकेश रडके, विजय जवजाळ, अभिजित भोजने, अजय राऊत, मनोहर भेटाळू, सुधीर कावरे, प्रफुल्ल गाजरे, नंदू पारीसे, शुभम काळे, जावेद पठाण, शाम पारीसे, राजू ततरपाडे, अजय भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

Related to this topic: