Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

अधिकमासातील सर्वात अनमोल भेट! शेतकरी सासऱ्याने जावयाला दिले जीवनदान

हिंदू संस्कृतीत अधिकमासाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते.


अधिकमासातील सर्वात अनमोल भेट शेतकरी सासऱ्याने जावयाला दिले जीवनदान

Kidney Donation |

किडनी दान करून लेकीचा संसार वाचवला; कामेगावच्या शेतकरी पित्याच्या त्यागाला सलाम

औसा (Kidney Donation) : हिंदू संस्कृतीत अधिकमासाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या महिन्याला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या काळात लेक-जावयाचा सन्मान करण्याची परंपरा आहे. जावयाला अनारसे, धोंडे, कपडे, सोन्याची अंगठी किंवा इतर भेटवस्तू देऊन त्याचा गौरव केला जातो. मात्र यावर्षी अधिकमासाच्या निमित्ताने एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अशी भेट दिली आहे, जी कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. ही भेट म्हणजे साक्षात जीवनदान.

ही प्रेरणादायी घटना शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला, लातूर येथील ग्रंथपाल श्री. दयानंद कोरके आणि त्यांचे सासरे श्री. भाऊसाहेब गणपती मुदगुणे (रा. कामेगाव, ता. धाराशिव, जि. धाराशिव) यांच्याशी संबंधित आहे.

श्री. दयानंद कोरके यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. आयुष्य, संसार आणि भवितव्य यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. वैद्यकीय उपचारांनंतर किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता.

अशा कठीण प्रसंगी त्यांचे सासरे श्री. भाऊसाहेब गणपती मुदगुणे पुढे सरसावले. कामेगाव येथील शेती करणाऱ्या या साध्या शेतकऱ्याने आपल्या लेकीच्या संसारावर आलेले संकट पाहून कोणताही स्वार्थ, भीती किंवा संकोच न बाळगता स्वतःची एक किडनी जावयाला दान करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा नव्हता, तर तो प्रेम, त्याग, कुटुंबनिष्ठा आणि माणुसकीचा सर्वोच्च आदर्श ठरला. त्यांच्या या निर्णयामुळे श्री. दयानंद कोरके यांना नवजीवन मिळाले आणि कुटुंबाला नव्या आशेचा किरण लाभला.

अधिकमासात जावयाला विविध भेटवस्तू देण्याची परंपरा असली, तरी श्री. भाऊसाहेब मुदगुणे यांनी आपल्या जावयाला दिलेले जीवनदान हे खऱ्या अर्थाने सर्वात अनमोल व अद्वितीय वाण ठरले आहे. त्यांनी आपल्या लेकीचा संसार वाचवला, तिच्या आयुष्यातील संकट दूर केले आणि जावयाला नव्याने जगण्याची संधी दिली.

आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात अशा प्रकारचे निस्वार्थ प्रेम व त्याग दुर्मिळ होत चालला आहे. मात्र कामेगावच्या या शेतकरी पित्याने आपल्या कृतीतून नात्यांचे खरे मूल्य काय असते, याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

त्यांनी केवळ किडनी दान केली नाही, तर प्रेम, माया, जबाबदारी आणि समर्पणाचा सर्वोच्च पुरावा दिला. त्यांचा हा त्याग समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश देणारा आहे.

विश्वेश्वर परिवारालाही अभिमान

विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला, लातूर परिवारालाही आपल्या सहकाऱ्याचा संघर्ष आणि त्यातून मिळालेले नवजीवन अभिमानास्पद वाटत आहे. श्री. दयानंद कोरके यांना लाभलेले जीवनदान आणि त्यांच्या सासऱ्यांचा त्याग भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

अधिकमासाच्या या पवित्र काळात श्री. भाऊसाहेब गणपती मुदगुणे यांच्या त्यागाला समाजातून सलाम केला जात असून, "धोंड्याच्या महिन्यात अनेक जावयांना भेटवस्तू मिळतात; मात्र दयानंद कोरके यांना त्यांच्या सासऱ्यांनी दिलेले जीवनदान हेच अधिकमासातील सर्वात अनमोल आणि अद्वितीय वाण ठरले आहे," अशी भावना व्यक्त होत आहे.

Related to this topic: