Nagpur Police Selection: खेडी गावातील तिन्ही युवकांची नागपुर पोलिस दलात निवड झाल्याने गावात उत्साह. अपोलो अकादमीमध्ये कठोर अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर यश.
अपोलो अकादमीतील मेहनतीचे फळ; पालक आणि कुटुंबियांमध्ये आनंद
कन्हान (Nagpur Police Selection) : पारशिवनी तालुक्याचा खेडी गावातील तीन आश्वासक तरुणांनी आपल्या संघर्ष, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर नागपुर पोलिस मध्ये निवड होऊन संपुर्ण परिसराला गौरव मिळवुन दिला आहे. एकाच वेळी तीघांची पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Nagpur Police Selection) निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आचल नंदुजी इंगळे, राकेश सुभाष कोचे आणि साहिल प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. हे तरुण काही वर्षांपूर्वी अपोलो अकादमीमध्ये दाखल झाले आणि तिथे दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सराव व अभ्यास करत राहिले. मर्यादित संसाधने असुनही या तरुणांनी अथक परिश्रमाने हे स्थान मिळविले आहे.
अलीकडेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. या (Nagpur Police Selection) पोलीस भरतीत खेडी गावातील तीन तरुणांनी पोलीस भरतीत लक्षणीय यश मिळविले आहे. त्यांचे वडील शेतकरी असुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या पालकांच्या कष्टाला हातभार लावत यश मिळवले आहे. तिघांचीही एकाच वेळी महाराष्ट्र पोलिसमध्ये निवड झाल्याचा कुटुंबाला अभिमान आहे. संभाषणादरम्यान, त्या तरुणांनी सांगितले की, कठीण परिस्थिती असुनही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही आणि आपली तयारी सुरूच ठेवली.
त्यांच्या निवडीची (Nagpur Police Selection) बातमी खेडी गावात पोहोचताच कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मिठाई वाटुन आनंद साजरा केला. लहानपणा पासुनच आचल, राकेश आणि साहिल यांनी पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले. चिकाटीने त्यांनी मोठे यश मिळविले आहे. इंगळे आणि कोचे कुटुंबातील या तरुणांचे यश आता इतर तरुणांना प्रेरणा देत आहे.