Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासगी बस अपघात

खासगी बस अपघातात पिंपळदरी येथील भावी पोलिस महिलेला दुखापत

Private Bus Accident: औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे हिला कोल्हापूरला जाताना खासगी बसचा अपघात झाला. तिला तात्काळ सांगोला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


खासगी बस अपघातात पिंपळदरी येथील भावी पोलिस महिलेला दुखापत

Private Bus Accident |

हिंगोली (Private Bus Accident) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील  सागर रिठ्ठे  ही तरूणी पोलिस दलाच्या भरती प्रक्रीयेत उत्तीर्ण झाली. त्यामुळे कोल्हापूरला कागदपत्र देण्याकरीता जात असताना खासगी बसचा अपघात झाला. त्यामध्ये ती किरकोळ रित्या जखमी झाली. 

मिळालेली माहिती अशी की, पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे ही कोल्हापूर पोलिस दलामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेत उत्तीर्ण झाली. कोल्हापूर येथे कागदपत्र देण्या करीता शुक्रवारी ९ मे रोजी जात असताना खासगी बसचा सांगोला गावाजवळ अपघात झाला. यामध्ये सागरच्या छातीला व पायाला मुका मार लागला. तिला तात्काळ सांगोला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु ९ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत कसे पोहचणार याची चिंता सागरला लागली होती.

तिच्या वडीलांनी ही घटना पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांना सांगितली. असता त्यांनी तात्काळ कोल्हापूरचे गृह पोलिस उपाधिक्षक तान्हाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून सागर रिठ्ठे ही (Private Bus Accident) अपघातात जखमी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सागर रिठ्ठे हिने तान्हाजी सावंत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच त्यांनी तु फक्त तब्येतेची काळजी घे, कागदपत्र जमा करण्या करीता सोमवारी आली तरी चालेल, कोणताही तान घेऊ नको, असे म्हणताच सागरला मोठा दिलासा मिळाला. तान्हाजी सावंत यांच्या या दिलासादायी शब्दामुळे तिच्या डोळ्यातून आश्रू बाहेर पडले.

Related to this topic: