Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

आता जनतेला केरोसीन मिळणार!

केंद्र व राज्य सरकारने केरोसीन विक्रीचा निर्णय घेतल्याने जनतेला स्वयंपाक करण्यासाठी व दिवाबत्तीसाठी साठी आता जनतेला किरोसीन मिळणार आहे.


आता जनतेला केरोसीन मिळणार

Kerosene Distribution |

बार्शीटाकळी (Kerosene Distribution) : आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने देशातील जनतेला इंधन टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून केंद्र व राज्य सरकारने केरोसीन विक्रीचा निर्णय घेतल्याने जनतेला स्वयंपाक करण्यासाठी व दिवाबत्तीसाठी साठी आता जनतेला किरोसीन मिळणार आहे.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात उद्भवणाऱ्या इंधन टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, केंद्र सरकारने 12 मार्च 2024 ला सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वयंपाकासाठी व दिवाबत्तीसाठी केरोसीन संदर्भात महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत राज्य सरकारने दिनांक 20 मार्चला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण नियम विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जनतेला केरोसीन विक्रीचे वाटप करण्याचे कळविले. त्यामुळे पाच ते सहा वर्षापासून जनतेला मिळत नसलेले केरोसीन आता लवकरच मिळणार आहे.

सदर केरोसीन वाटप किरकोळ हॉकर्स, अर्ध घाऊक व भाऊ केरौसीन परवाने असलेल्या केरोसुन विक्रेता यांचे मार्फतच जनतेला मिळणार आहे. यासाठी शासनाने तत्कालीन केरूशील परवानेचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केलेल्या तथापि नूतनीकरणासाठी प्रलंबित असलेल्या सर्व परवाना धारकांच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले आहे, असे समजण्यात यावे असे ग्राह्य धरून जनतेला या विक्रेता कडूनच आता केरोसीन मिळणार आहे. त्यामुळे पाच ते सहा वर्षापासून केरोसीन विक्रेताची कामे करणाऱ्या असंख्य व्यक्तीला आता पुन्हा केरोसीन चा व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच गावातील जनतेला इंधन टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्व केरोसीन विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात यावे

सरकारने पाच ते सहा वर्षां पूर्वी केरोसीन वाटपबंद केल्याने सर्व केरोसीन विक्रेत्यावर उपासमारीची पाळी आली होती. परंतु दुकानदारांनी सरकारच्या विरुद्ध केरोसीन विक्रेत्याने कोणाकडेही तक्रार केली नाही. यावेळी अनेक दुकानदारांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. याची जाणीव सरकारला असल्याने त्यांनी या दुकानदारांमार्फतच केरोसीन वाटपाचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला असून पूर्वीच्या परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांना केरोसीन विक्रीचे काम देण्यात यावे .असे मत बार्शीटाकळी तालुक्यातील परवानाधारक केरोसीन विक्रेताशामराव प्रल्हादराव धाईत यांनी व्यक्त केले. 

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये

सद्यस्थितीला विरोधकाकडून पेट्रोल डिझेल व गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरविण्यात येत असल्याने, केंद्र व राज्य सरकारने स्वयंपाकासाठीव दिवाबत्तीसाठी केरोसीन विक्रीचा चांगला निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक गावातील जनतेला लवकरच केरोसीन मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे प्रयत्नशील आहेत,असे मत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व बार्शीटाकळी पंचायत समितीचे माजी उपसभापतीसंजय चौधरीनी व्यक्त केले आहे.

Related to this topic: