Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

करवंड महोत्सव 2026

‘करवंड महोत्सव 2026’ निमित्त शिवरायांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन

Karwand Festival 2026: करवंड महोत्सव 2026 अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाईच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन


चिखली/बुलढाणा (Karwand Festival 2026) : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि करवंड येथील इंगळे घराण्यातील कन्या गुणवंताबाई यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा स्मरणार्थ यंदा प्रथमच ‘करवंड महोत्सव 2026’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी करवंड, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे उत्साहात पार पडणार आहे. शासन निर्णय क्र. संकीर्ण 8226/प्र.क्र.117 (E-16119994)/सां.का.4 दिनांक 31 मार्च 2026 तसेच आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांच्या निर्देशानुसार या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इतिहासातील नोंदीनुसार, 15 एप्रिल 1656 रोजी सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा पार पडला होता. या सुवर्णक्षणांची आठवण जतन करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. (Karwand Festival 2026) करवंड नगरीत होणारा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून, आपल्या परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचा गौरवशाली वारसा जपण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे. गावातील नागरिकांसह संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी हा दिवस अभिमानाचा आणि आनंदाचा ठरणार आहे.

या (Karwand Festival 2026) सोहळ्यात विवाह सोहळ्याचे प्रतीकात्मक पुनर्निर्माण करण्यात येणार असून, ऐतिहासिक वातावरणाची झलक अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. गावाच्या मातीमध्ये जिवंत असलेल्या त्या सुवर्णक्षणांची पुनःप्रत्ययकारी अनुभूती या महोत्सवातून मिळणार आहे. दरम्यान, शिवप्रेमी अमोल साठे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “हा महाराजांचा विवाह सोहळा आहे… आपण सर्वांनी आपल्या परिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.” प्रशासनानेही माध्यम प्रतिनिधी व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, या भव्य सोहळ्याची माहिती सर्वदूर पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: