Wasmat Ration Crackdown: वसमत नांदेड रस्त्यावर माळवटा शिवारात बुधवारी राशनच्या धान्याचा ट्रक जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व वसमत ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई
एलसीबीच्या पथकाने केली कारवाई
वसमत (Wasmat Ration Crackdown) : वसमत नांदेड रस्त्यावर माळवटा शिवारात बुधवारी राशनच्या धान्याचा ट्रक जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व वसमत ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई केली असण्याचे समोर येत आहे पकडलेला धान्याचा ट्रक वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून लावला आहे ट्रक मधील धान्य राशन चे आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी धान्याचे नमुने तहसील कार्यालयात देण्यात आलेले आहेत रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच राशनचा धान्य पकडण्याची कारवाई झाली हे विशेष त्यामुळे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत तालुक्यात राशनचा मोठा काळा बाजार चालतो हे सर्वश्रुत आहे मात्र कारवाया होत नाहीत वसमत तालुक्यात लहान सहान टेक्निकल कारवाया मोठ्या प्रमाणात होतात मात्र राशनचे धान्य कधीच पकडले जात नाही हा वसमतचा अफलातून पॅटर्न आहे खुलेआम राशनचे धान्य खरेदी करून नांदेड, हैदराबादला वाहनाद्वारे पाठवणारे मोठे रॅकेट वसमत मध्ये आहे मात्र कारवाया काही होत नाहीत पुरवठा विभागाकडून तर कारवाई होतच नाही एलसीबी पथक व स्थानिक पोलिसांकडूनही राशनच्या धान्याकडे वाकडी नजर कधी होत नाही त्यातून वसमत तालुक्यात राशनच्या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होतो आहे.
हिंगोली जिल्ह्याचा पदभार नवीन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच वसमत येथे राशनचे धान्याची गाडी पकडल्याची घटना घडली आहे त्यामुळे राशन माफिया मध्ये खळबळ उडाली आहे वसमत नांदेड रस्त्यावरील माळवटा शिवारात बुधवारी दुपारी एम एच 43 एडी 9746 या वाहनामध्ये राशनचे धान्य असल्याचा संशय असल्याने एलसीबीच्या पथकाने ती गाडी पकडली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली राशनचे धान्य असल्याचा संशयावरून सदर वाहन वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले आहे या गाडीत 110 कट्टे धान्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी राशनचे धान्य असल्याच्या संशयावरून एलसीबीच्या पथकाने वाहन ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आलेले आहे मात्र हे धान्य राशनचे आहे किंवा नाही याची खात्री झालेली नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे खात्री करण्यासाठी धान्याचे नमुने तहसील कार्यालयात देण्यात आले असल्याचेही पोलिसांनी सांगितले अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.
राशनचे धान्य आहे अशी पक्की खबर मिळाल्यानंतर एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी सापळा लावून गाडी पकडल्यानंतर आता राशनचे धान्य आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस महसूल विभागाकडे बोट दाखवत आहेत त्यामुळे या प्रकरणात यापुढे नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राशनवर पहिल्यांदाच कारवाई
कित्येक दिवसानंतर पहिल्यांदाच वसमत तालुक्यात राशनचे धान्य पकडण्याची कारवाई झाली मागील पोलीस अधीक्षकांच्या काळात वसमत तालुक्यात राशनच्या धान्याच्या विरोधात एकही कारवाई झाली नव्हती मात्र पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पोलीस अधीक्षकांचा पदभार घेतल्यानंतर वसमत तालुक्यात पहिल्यांदाच राशनचे धान्य असल्याच्या संशयावरून वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले आहे.
वाहन पकडल्यानंतर गुन्हा नोंदवण्यापूर्वी पोलिसांनी महसूल विभागाकडे अहवाल मागवण्यासाठी नमुने पाठवणे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र जुन्या अनुभवानुसार "हे राशनचे धान्य आहे असे वाटत नाही" असा सोयीचा अहवाल येतो व धान्य ट्रक सोडून देण्याची वेळ येते असे यावेळी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलीस अधीक्षकांनी वसमत तालुक्यातील राशनच्या धान्याच्या काळा बाजाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.