Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कॉकरोच जनता पार्टी

कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी आत्महत्यांवर व्यक्त केला संताप

Cockroach Janata Party: अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी आत्महत्यांबद्दल गावकरांच्या समोर टीकांचा उल्लेख करून, त्यांचे व家च्या परिस्थितीच्या समस्या आणि सरकारच्या नकारात्मक कार्यकृतीं


कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी आत्महत्यांवर व्यक्त केला संताप 

Cockroach Janata Party |


हिंगोली तालुक्यातीलसंतुक पिंपरी येथे अभिजीत दिपके यांचे उत्साहात स्वागत

हिंगोली (Cockroach Janata Party) : कॉकरोच पार्टीचे नेते अभिजीत दिपके तब्बल दीड वर्षांनंतर त्यांच्या मूळ गावी, संतुक पिंपरी येथे आले. गावात उभारलेल्या भगव्या-पांढर्‍या मंडपात आयोजित जाहीर सभेत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला व तरुण उपस्थित होते. अनेक तरुण त्यांचे भाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते.

भाषणादरम्यान अभिजीत दिपके (Cockroach Janata Party) भावुक झाले. ‘मी जवळपास दीड वर्षानंतर गावाकडे येतोय. लहानपणी इथंच वाढलेलो आहे. शेतात जायचो, त्या आठवणी आज परत येत आहेत,’ असे ते म्हणाले. त्यांनी गावकर्‍यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि ‘जोपर्यंत तुम्ही सगळे सोबत आहात तोपर्यंत दिल्लीतही आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेऊ,’ अशी ग्वाही दिली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या वक्तव्याला प्रतिसाद दिला. दिपके यांनी भाषणात विद्यार्थी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. ‘आत्तापर्यंत ११ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मी मागच्या आठवड्यात त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली,’ असे त्यांनी सांगितले.

प्रदीप नावाच्या विद्यार्थ्याचे उदाहरण देत ते म्हणाले की, त्याच्या वडिलांनी १० लाखांचं कर्ज घेतलं होतं आणि शेती विकली होती. मुलगा डॉक्टर बनून घर चालवेल, कर्ज फेडेल अशी अपेक्षा होती. पण आज त्याच्या वडलांवर १५ लाखांचं कर्ज आहे आणि जमीनही गेलेली आहे. तरीही सरकारने मदत केली नाही, साधा फोनसुद्धा उचलला नाही, असा आरोप त्यांनी केला. ‘तुमच्यासमोर मी तुमचं एक लेकरू आहे, जे तुमच्यासमोरच वाढलेलं आहे. फक्त असाच पाठिंबा देत राहा,’ अशी साद घालत (Cockroach Janata Party) अभिजीत दिपके यांनी भाषणाचा समारोप केला. कार्यक्रमाला स्थानिक नेते व कार्यकर्तेही उपस्थित होते.

Related to this topic: