Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शक्तिपीठ महामार्ग विरोध

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

Shaktipeth Highway Protest: कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात तालुक्यातील विविध भागातील सुपिक शेतजमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे.


शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

Shaktipeth Highway Protest |

आखाडा बाळापूर (Shaktipeth Highway Protest) : कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात तालुक्यातील विविध भागातील सुपिक शेतजमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे.विविध भागातील शेतकऱ्यांनी कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुत्ते यांना निवेदन देऊन महामार्गाला विरोध दर्शविला. २५ जून रोजी कांडली, आखाडा बाळापूर, शेवाळा, सिंदगी, जांब, निमटोक व इतर भागातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुत्ते यांना निवेदन देऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला.

दरम्यान कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध (Shaktipeth Highway Protest) दर्शविला आहे. यात सुपिक जमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे.काही दिवसांपूर्वीच शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील कांडली फाटा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते.