Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान महामार्ग अतिक्रमण

कन्हान शहरातील महामार्ग फुटपाथ वरील मलमा व नाल्यातील कचरा साफ कधी होणार?

Kanhan Highway Encroachment: दीड वर्ष लोटुन सुध्दा अद्याप या नाली ची सफाई व फुटपाथ वरील मोठया प्रमाणात असलेला गिट्टी, रेती, दगडाचा मलमा उचलुन फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यास मोकळा न केल्याने...


कन्हान शहरातील महामार्ग फुटपाथ वरील मलमा व नाल्यातील कचरा साफ कधी होणार 

Kanhan Highway Encroachment |

कन्हान (Kanhan Highway Encroachment) : होम पाईप कंपनी गेट पासुन तर आंनद रेस्टारेंट पर्यंत महामार्गा लगतच्या दुकाने नगरपरिषदेने मुख्य नाली सफाई करिता आणि फुटपाथ मोकळा करण्याकरिता अतिक्रमणाच्या नावावर ८० दुकाने तोडुन दुकानदा राना बेरोजगार करण्यात आली. परंतु दीड वर्ष लोटुन सुध्दा अद्याप या नाली ची सफाई व फुटपाथ वरील मोठया प्रमाणात असलेला गिट्टी, रेती, दगडाचा मलमा उचलुन फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यास मोकळा न केल्याने नगरपरिषद प्रशासनावर नागरिकांचा रौष वाढत असल्याने मुख्याधिकारी यांनी तात्काळ महामार्ग लगत नाली व फुटपाथ वरील अतिक्रमण काढुन पाऊस येण्यापुर्वी नालीची दुरूस्ती व साफसफाई करून फुटपाथ नागरिकां ना ये-जा करण्यास मोकळा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 
           
कन्हान शहरातील नागपुर जबलपुर महामार्गा च्या दोन्ही बाजुला  वसलेल्या छोटया मोठया दुकाना पैकी आंनद रेस्टारेंट पासुन तर होम पाईप कंपनी गेट पर्यंत असलेल्या दुकानाना नगरपरिषद कन्हान -पिपरी मुख्याधिकारी दिपक घोडके हयानी मुख्य नाली व फुट पाथवरील अतिक्र मण काढण्याच्या नावाने (दि. ४) जानेवारी २०२५ ला राज्यमार्ग व महा मार्ग अधिकारी व तगडा पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावुन जवळपास ८० दुकाने तोडुन त्या दुकानावर ३० वर्षापासुन परिवाराचा उदरनिर्वाह करणा-या दुकानदाना बेरोजगार केले. तोडलेल्या दुकानाचा मलमा पुर्ण न उचलता तेथेच सोडला आणि त्याच रात्री ले-आऊट धारकाने चुरी, गिट्टी, रेती टाकुन नाली, फुटपाथ पुर्णत: दिसेनाशा केला.

तसेच लेआऊट धारकाच्या गिट्टी, रेती भरलेल्या ट्रकानी ती नाली शतिग्रस्त होऊन जागो जागी तोडल्या गेली. जी नाली साफ करण्याकरिता आणि फुटपाथ नागरि कासाठी मोकळा करण्याकरिता नगरपरिषदेने अतिक्रमण कार्यवाई केली. (Kanhan Highway Encroachment) परंतु आदी पेक्षा जास्त मलम्याने नाली व फुटपाथ दिसेनाशी झाल्याने नागरिकांना फुटपाथ मोकळा मिळत नसल्याने वारंवार नगरपरिषदेला निवेदन देऊन या नालीची दुरूस्त व साफसफाई करावी. तसेच नाली व फुटपाथ वरील फेकाऊ मलमा संबधित ले-आऊट धारकावर कारवाई करून पावसाळयाचे पाणी निकासी होण्याकरिता स्वच्छ करून फुटपाथ सर्वसामान्य नागरिकाकरिता त्वरित मोकळा करून दयावा. आता पर्यंत एक पावसाळा लोटुन दुसरा पावसाळा आला तरी अद्याप नगरपरिषद मुख्याधिकारी गप्प का? नगरपरिषद प्रशासन मुंग गिळुन सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष करित का आहे ? असे नानाविध प्रश्न नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे. 

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार गुन्हे नोंदवावे लागतील का?

शासनाने करोडो रुपये खर्च करून, रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाली सहित फुटपाथ चे बांधकाम केले आहे, नगर प्रशासनाच्या वेतनावर आणि लोक प्रतिनिधीच्या निवडणुकीवर जनतेच्या पैशातुन करोडो रुपये खर्च होतात. त्याचे कमिशन सुद्धा यांना मिळत असते, इतके सर्व असुन सुद्धा नागरी सुविधावर यांचे दुर्लक्ष होत आहे. सर्व फुटपाथ अतिक्रमित झाले असुन सर्व नाल्यांमध्ये कचरा भरला आहे, आता तरी नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ? अन्यथा यांचेवर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार गुन्हे नोंदवावे लागतील का ? पंधरा दिवसात काहीच कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक नागपुर यांच्याकडे गुन्हा नोंदविण्यात येईल याची कृपया प्रशासक आणि नगराध्यक्ष यांनी नोंद घ्यावी. असे ज्येष्ठ नागरिक संघ, कन्हान व्दारे इशारा देण्यात आला आहे.