Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान नगरपरिषद

कन्हान-पिपरी विकास आराखड्यातील आरक्षित जागा पुनर्स्थापित करा; अन्यथा काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Kanhan Municipal Council: नगरपरिषद कन्हान-पिपरी विकास आरा खड्यात स्टेडियम व प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा आरक्षणातुन वगळण्यात आल्याच्या तसेच स्मशान भूमीसाठी मंजुर झालेल्या १.२० कोटी रुपये


कन्हान-पिपरी विकास आराखड्यातील आरक्षित जागा पुनर्स्थापित करा अन्यथा काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Kanhan Municipal Council |

कन्हान (Kanhan Municipal Council) : नगरपरिषद कन्हान-पिपरी विकास आरा खड्यात स्टेडियम व प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा आरक्षणातुन वगळण्यात आल्याच्या तसेच स्मशान भूमीसाठी मंजुर झालेल्या १.२० कोटी रुपयांच्या निधीचा वापर अद्याप न झाल्याच्या पार्श्वभू मीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.६) जुलै ला कन्हान नगरपरिषदेत धडक देत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

रामटेकचे माजी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे व मुख्याधिकारी दीपक घोडके यांच्याशी चर्चा करून कन्हानच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वा ची असलेली स्टेडियम व प्राथमिक शाळेची जागा पुन्हा (Kanhan Municipal Council) आरक्षणात समाविष्ट करावी किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच संबंधित जागेचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी स्मशान भूमीच्या बांध कामासाठी मागील वर्षी मंजुर झालेल्या १.२० कोटी रुपयांच्या निधीचा आज पर्यंत वापर का करण्यात आला नाही, असा थेट सवाल नगराध्यक्ष व मुख्याधि काऱ्यांना करण्यात आला.

यावर (Kanhan Municipal Council) नगराध्यक्षांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्या चे आश्वासन दिले. मात्र स्टेडियम व शाळेसाठीचे आर क्षण कायम करण्यात आले नाही किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही, तर कन्हान च्या विकासाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदो लन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी काँग्रेसच्या गटनेत्या रेखाताई टोहणे, नगरसेव क समशेर पुरवले, नगरसेविका नितीताई तेलोते, माजी उपाध्यक्ष योगेंद्र बाबु रंगारी, माजी नगराध्यक्षा करुणा आष्ठणकर, शेखर पडोळे, माजी सरपंच बळवंत पडोळे , माजी नगरसेवक विनय यादव, मनिष भिवगडे, राखी ताई परते, दर्शना तिडके, प्रशांत मसार, गौरव माहोरे, अर्जुन पात्रे, सिद्धू ढोके, प्रविण गोडे, प्रदिप बावणे, अमोल प्रसाद, गणेश भालेकर, संदीप परते, सतिश पाली, शेखर बोरकर, दीपकजी शर्मा, निंबा केवट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.