Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान पोलिओ लसीकरण

कन्हान शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद; ९३ टक्के बालकांना पोलिओ डोज

Kanhan Polio Vaccination: कन्हान शहरातील नगरपरिषद व आरोग्य विभागाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून जास्तीत जास्त ४३५२ बालकांना लस


कन्हान शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद ९३ टक्के बालकांना पोलिओ डोज

Kanhan Polio Vaccination |

कन्हान (Kanhan Polio Vaccination) :  नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेचा शुभारंभ नवनियुक्त आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

कन्हान आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील एकुण ४७ बुथवर ट्रॉझिंट चंमु ६ च्या मदतीने एकुण ४,७०२ बालकांपैकी ४,३५२ बालकांना पोलिओ प्रति बंधक डोस देण्यात आला. त्यामुळे सुमारे ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या मोहिमेत पारशिवनी तालुका वैद्यकिय अधि कारी डॉ. आशिर्वाद नागपुरकर, कन्हान वैद्यकीय अधि कारी डॉ. आकांशा कानफाडे, डॉ. वैष्णवी जगताप, डॉ. आयुषी डंभारे तसेच आरोग्य सहाय्यक हंसराज ढोक, सुनिल गायकवाड, आरोग्य सहाय्यिका संगिता का़ळबांडे, बंड, देशभ्रतार, सोनोणे, सांगोडे, गौरव भोयर, चेतन सहारे, पराते, चौधरी, गांजवे, इंगळे आदी सह आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांनीही आपल्या पाल्यां ना पोलिओचे दोन थेंब पाजुन मोहिमेला भरघोस प्रति साद दिला. (Kanhan Polio Vaccination) आरोग्य विभागाने उर्वरित पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणा र असल्याचे सांगितले असुन ‘पोलिओमुक्त भारत’ अभियान यशस्विकरण्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Related to this topic: