Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

गॅस सिलेंडर कमतरता

कन्हान शहर व परिसरात गँस सिंलेंडर च्या अपु-या पुरवठयाने नागरिक त्रस्त

Gas Cylinder Crisis: कन्हान शहर आणि परिसरात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. कमतरतेचे तातडीने निराकरणासाठी मागणी केली जात आहे.


कन्हान शहर व परिसरात गँस सिंलेंडर च्या अपु-या पुरवठयाने नागरिक त्रस्त

Gas Cylinder Crisis |

कन्हान (Gas Cylinder Crisis) : पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहर हे परिसरातील गावाची बाजारपेठ असुन अधिकृत गँस सिलेडर वितरण एंजन्सी नसल्यामुळे येथिल नागरिकां ना कित्येक वर्षापासुन कामठीच्या तिवारी आणि कोठारी गँस या दोन एंजन्सी व्दारे ब्लँक डॉयमंड सो सायटी सह तीन ते चार सह वितरका व्दारे सिलेंडर चा पुरवठा केला जातो. पंधरा दिवसापासुन अपु-या पुरव ठयामुळे नागरिकाना गँस सिलेंडर (Gas Cylinder Crisis) करिता नागरिक त्रस्त असल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी दोन्ही एंजन्सीला निवेदन देऊन कन्हान शहर व परिसरात पुरेशा गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा कर ण्याची मागणी केली आहे. 

कन्हान शहर व ग्रामिण दाट लोकवस्ती असुन सुध्दा परिसरात सध्या ब्लँक डॉयमंड सोसायटी टेका डी वसाहत सह तीन ते चार गॅस सिलेंडर सह वितरक कार्यरत आहेत. ज्यांना कामठी येथील दोन्ही गॅस एज न्सींमार्फत गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, हा पुरवठा कन्हान परिसरातील वाढत्या मागणीच्या तुलनेत अजिबात पुरेसा नाही. कन्हान परिसरात दर रोज अंदाजे ३०० ते ४०० गॅस सिलेंडरची आवश्यकता असते, परंतु सध्या उपलब्ध करून दिला जाणारा पुर वठा मागणीची पूर्तता करण्यात अपुरा पडत आहे.

त्या मुळे सर्वसामान्य नागरिक, ग्राहकांना घरघृती गँस सिलेंडर (Gas Cylinder Crisis) करिता मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करा वा लागत आहे. या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्य कर्ता प्रशांत बाजीराव मसार व चंद्रशेखर अरगुलेवार यांनी विशेष लक्ष वेधत कन्हान परिसरातील प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात त्वरित वाढ करावी, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल व कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. समस्येचे तातडीने निराकरण करून कन्हान परिसरात पुरेशा प्रमाणात गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा करण्याची मागणी तिवारी आणि कोठारी गँस एंजन्सीच्या व्यव स्थापकांशी भेटुन निवेदन देऊन मागणी केली आहे.

Related to this topic: