Children Summer Camp: कांद्रीत समाजभवनात 'बाल योग समर शिबिर'चे शिबिराची समाप्ती केली गेली. या कार्यक्रमामध्ये सरस्वती माता मंदिरापासून सुरू करण्यात आले, आणि योगाचा अभ्यास
कन्हान (Children Summer Camp) : सुख, शांती, समाधान शाखा कांद्रीच्या वतीने पाटील नगर वार्ड क्रमांक १७ येथील समाज भवनात शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला बळीरामजी दखणे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके, नगरसेवक राकेश लांजेवार प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. (Children Summer Camp) योग शिक्षिका मीना रामटेके यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धि क आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावुन सांगत नियमित योगाभ्यास करण्याचा संदेश दिला. यावेळी प्रमुख अतिथी विशाखा ठमके यांनी मुलांना योगामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि एकाग्रता वाढते तसेच दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार केल्यास चांगले आरोग्य लाभते असे सांगुन योगाचे महत्त्व पटवुन दिले. त्यांनी आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले.

यावेळी नगरसेवक राकेश लांजेवार यांनी ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यां ना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. शिबिराचे नियोजन व मार्गदर्शन योग शिक्षिका मीना रामटेके आणि शालु गांजवे यांनी केले होते. कार्यक्रमाला पंकज रामटेके, राजेश गांजवे, राजा संभोजी, मनिष शंभरकर, जगबंधु ठमके, सहारे अंकल , मनिषा ठाकरे, भारती माणिकपुरी, अर्चना शर्मा, सविता चोबे, चित्रलेखा भालेकर, अहिल्या वर्मा, नीतु चोबे, मंगला साखरकर, वर्षा डोंगरे, रविका भोवते यांच्यासह परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.