Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी पोलीस प्रशासन

शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार

Kalamanuri Police: 7 जुलैपासून सुरू होणाऱ्या हजरत सरकार नुरुद्दीन नुरी शहीद दर्ग्याच्या उरुस सोहळ्यात पोलिसांनी सहकार्य करीत असून शांतता राखण्यासाठी विशेष उपायोचित


शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार

Kalamanuri Police |

कळमनुरी (Kalamanuri Police) : हजरत सरकार नुरुद्दीन नुरी शहीद दर्गा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत सरकार नुरुद्दीन नुरी शहीद (र.अ.) यांचा उरुस सोहळा 7 जुलैपासून सुरू होत आहे. या उरुसामध्ये सर्व धर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून राज्यासह देशातील विविध भागांतून भाविक कळमनुरी येथे दाखल होतात. उरुस काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी शहरातील उलेमा, दर्ग्याचे मुतवल्ली तसेच पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

उरुस सोहळा शांततापूर्ण व आनंदमय वातावरणात पार पडावा, यासाठी 7 जुलैपासून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच समाजकंटक व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार असून अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिला. यावेळी उपस्थित सर्व उलेमा, दर्गा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शहरातील मान्यवरांनी उरुस सोहळा शांततेत व बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.