Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खा. संजय दिना पाटील

खा. संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कार्यवाही करा

MP Sanjay Dina Patil: पत्रकार संघाने खासदारांना भाषेत धमकी दिल्याचा आरोप करून, संजय दिना पाटील यांच्यावर 'पत्रकार सञरक्षण कायदा' व्‍यवहार करण्याची मागणी नोंदवली.


खा संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कार्यवाही करा

MP Sanjay Dina Patil |

 

कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन

कळमनुरी (MP Sanjay Dina Patil) : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना देण्यात आलेली 'वाय'दर्जाची सुरक्षा व्यवस्था तत्काळ काढून घेण्यात यावी, अशी मागणी कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय दिना पाटील (MP Sanjay Dina Patil) व इतर पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत माहिती घेण्यासाठी पत्रकार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी काही प्रश्न विचारल्यानंतर खासदारांनी संयम गमावत पत्रकारांशी अर्वाच्च भाषेत बोलून "परत आलात तर मारून टाकीन, माझ्या नादी लागू नका, कोणाकडे तक्रार करायची ती करा," अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्रकार संघाने या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत, एका लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा व वर्तन लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तसेच, शासनाने दिलेल्या 'वाय' दर्जाच्या सुरक्षेच्या उपस्थितीतच पत्रकारांना धमकावण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा वापर पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी होऊ नये, त्यामुळे खासदारांची सुरक्षा व्यवस्था तत्काळ काढून घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर नंदकिशोर तोषणीवाल, दिलीप खोडके, अलीमोद्दीन कादरी, उमर फारुक शेख, मुजीब पठाण, मोहम्मद रफीक, नारायण काळे, संजय चितळे,विजय जोंधळे, अनवर नाईक, शेख अफजल, शेख मुजमील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.