Kalamnuri Riot Control: शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दंगा नियंत्रण योजनेअंतर्गत रंगीत तालीम व प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सरावाचे आयोजन
कळमनुरी (Kalamnuri Riot Control) : शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दंगा नियंत्रण योजनेअंतर्गत रंगीत तालीम व प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सरावाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सपोनी रघुनाथ शेवाळे, दिलीप पोले, कानबाराव हराळ, गजानन होळकर,शेख रहीम, सुजित फुसनाके, कोटकर, विलास बांगर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड उपस्थित होते.
दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविणे तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखणे, या उद्देशाने ही रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी (Kalamnuri Riot Control) विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये पोलीस दलाने कशा पद्धतीने कार्यवाही करावी, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या सरावामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांची दंगा नियंत्रणाबाबतची तयारी अधिक सक्षम होण्यास मदत झाली.