Revenue Squad Action: कळमनुरी तालुक्यातील वाळू घाटात महसूल पथकाने मोठ्या प्रमाणावर वाळू जप्त करून अवैध उत्खननावर अंकुश लावला, 11 हायवा व 4 जेसीबी सहित जप्त.
11 हायवा, 4 जेसीबी जप्त; साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक जिल्हा अधिकारी योगेश कुमार मीना यांच्या पथकाची धडक कार्यवाही
आखाडा बाळापूर (Revenue Squad Action) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी (बु) शिवारातील कयाधू नदीच्या पात्रातील वाळू घाटात बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात होणारा वाळूचा उपसा थांबवून सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना व (Revenue Squad Action) महसूल पथकाने बेधडक मोठी कार्यवाही करून 11 हायवा, 4 जेसीबी पोकलेन असा सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी उशिरापर्यंत कार्यवाही घटनास्थळी सुरु होती सदर वाहने शनिवारी पोलीस स्थानकात लावण्यात आली.
कळमनुरी तालुक्याबरोबर जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला परंतु यापैकी अनेक घाटावर नियम निकष खुंटीला टांगून बेसुमार उपसा होतो ही वस्तुस्थिती आहे. याबाबत काही ठिकाणच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे (Revenue Squad Action) प्राप्त झालेल्या होत्या. वाळू घाटावर मजूरांच्या सहाय्याने वाळू उपसा करणे आवश्यक असताना जेसीसी मशीन, बोटीद्वारे रात्रदिवस उपसा होतो.
या तक्रारी प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्ह्याधिकारी योगेशकुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, आनंद काकडे, प्रेम चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम, विशाल देशमुख येलकीकर,महेश गळाकाटू, साईनाथ वानखेडे,प्रसन्न देशमुख, संतोष मुधोळ, चंद्रकांत पोटे,अशोक कुलाते महसूल पथकाने 27मार्च रोजी दुपारी उशिरा पाहणी केली तेव्हा बोटीद्वारे बिनधास्त वाळूचा उपसा होत असल्याचे आढळून आले पथकाने तातडीने पावले उचलून 11हायवा, 4 जेसीबी, 4 बोटी असा साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी व शनिवारी उशिरापर्यंत महसूल पथकाची कार्यवाही सुरु होती. जप्त वाहन पोलीस स्थानकात लावण्यात आली आहे.
अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी जाळून नष्ट..
नियम निकष खुंटीला टांगून बोटीद्वारे अवैध बेसुमार वाळू उपसा पथकाने रोखून यावेळी वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळून नष्ट करण्यात आलेल्या आहेत.तालुक्यातील विविध मंडळ अंतर्गत असे नियम निकष बाजूला करून बेसुमार वाळू उपसा, गौणखणीज उत्खनन होते महसूल विभागाने प्रथमच अशी धडक कार्यवाही केली यामुळे बेसुमार वाळू उपसा व अवैध गौणखणीज उत्खनन करणाऱ्यांची झोप उडाली आहे.