Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी नगराध्यक्ष

कळमनुरीत नगराध्यक्ष पदाच्या गैरवापराचा आरोप

Kalmanuri Mayor: कळमनुरीत नगराध्यक्षांसह पतीवर कारवाईची मागणी. नगरपरिषदेत नगराध्यक्षांच्या पतीने प्रभाव गैरवापर केल्याचा आरोप आणि प्रॉक्सी प्रतिनिधित्वाचे गंभीर प्रकरण समोर.


कळमनुरीत नगराध्यक्ष पदाच्या गैरवापराचा आरोप

Kalmanuri Mayor |

नगराध्यक्षांसह पतीवर कारवाईची करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

हिंगोली (Kalmanuri Mayor) : कळमनुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे शहरात राजकीय व प्रशासकीय स्तरावर खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, कळमनुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद महिला आरक्षणातून निवडून आलेले असताना प्रत्यक्ष कारभारात त्यांच्या पती वैभव चौधरी उर्फ आर.आर. पाटील हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी स्वतःला “नगराध्यक्ष” (Kalmanuri Mayor) म्हणून संबोधत सोशल मीडियावर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच शासकीय व्यासपीठावर वावर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, नगराध्यक्षांच्या पतीकडून शासकीय पदाचा वापर करून विविध ठिकाणी स्वतःचा प्रभाव निर्माण केला जात असल्याचा आरोप आहे.

शहरात वितरित करण्यात आलेल्या कॅलेंडर, बॅनर, पोस्टर तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धीमध्ये स्वतःला “नगराध्यक्ष” (Kalmanuri Mayor) म्हणून दर्शविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकाराला “प्रॉक्सी प्रतिनिधित्व”  असे संबोधण्यात येत असून महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच यामुळे धक्का बसत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66D, भारतीय दंड संहिता कलम 419, 420 व 171 अंतर्गत गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली व प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की, या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या घटनेमुळे कळमनुरीत राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर  वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे,माजी तालुकाध्यक्ष राजु कांबळे, युवा तालुकाध्यक्ष शेख असलम,दिनेश पाईकराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related to this topic: