Mahatma Basaveshwar Jayanti: कळमनुरी येथे महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात अनेक मान्यवर व महिला भाविकांचा समावेश होता.
कळमनुरी (Mahatma Basaveshwar Jayanti) : शहरातील तोटलिंग स्वामी मठ संस्थान येथून रविवार तारीख 19 ला सकाळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला भाविक सहभागी झाले होते. मठ संस्थान येथून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची करण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये शिवाचार्य महादेव महाराज, नगराध्यक्ष आश्लेषा राजू चौधरी, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे ,कळमनुरी विधान सभा युवा सेना तालुका अध्यक्ष राजू चौधरी, नगरसेवक कैलास पारवे ,गजानन पाटील सतीश खर्जुले ,नगर सेवक शैलेश उबाळे ,विलास शिंदे,नगर सेवक बबलू पत्की ,किशोर भालेराव,पत्रकार संजय कापसे,ऍड विश्वनाथ चौधरी ,राजू पटणे, संतोष साखरे, सुरज साखरे ,गजानन लासीनकर ,राजू शेटे, अशोक सांगेकर ,राजू संगेकर, बाळू घुसे ,सुरेश सोनुणे ,नागेश सोनुने, प्रवीण व्यवहारे ,गजानन थळपते ,नागेश बारहाते, गणेश आप्पा पंचलिंगे, बबलू पंचलिंगे, यांच्यासह महिला व भाविक सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा समारोप गुरु तोटलिंग स्वामी मठ संस्थान येथे करण्यात आला यावेळी शिवाचार्य महादेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आरती घेण्यात आली त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आली होती.

महात्मा बसवेश्वर जयंती (Mahatma Basaveshwar Jayanti) निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आमदार संतोष बांगर ,नगर सेवक राम कदम यांनी सहभाग नोंदवून महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले तर भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांनी ही महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी अमिश दरक ,ओमकार नावडे, अशोक संगेकर, योगेश संगेकर, यांच्या सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.