Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी वनीकरण विभाग

कळमनुरी सामाजिक विभागातील वृक्षलागवडीत मोठा सावळा गोंधळ

Kalamanuri Forestry Division: कळमनुरी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्षलागवडीच्या कामांमध्ये गोंधळ उडाला. पाच वेळाच्या पत्रांनंतरही आवश्यक कागदपत्रे विभाग


कळमनुरी सामाजिक विभागातील वृक्षलागवडीत मोठा सावळा गोंधळ

Kalamanuri Forestry Division |

 

झालेल्या कामाची माहिती देण्यासाठी टाळाटाळ

कळमनुरी (Kalamanuri Forestry Division) : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची चौकशी दडपण्यासाठी वनीकरण विभागाकडून चौकशी पथकाला कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वेळा पत्र देऊनही वनीकरण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौकशी पथकाने या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. याप्रकरणी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. 

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून (Kalamanuri Forestry Division) वृक्षलागवडीच्या नावाखाली केलेल्या कामांवर बोगस मजूर दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. यातक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुते यांनी पथक स्थापन करून चौकशीची तयारी चालवली होती. या चौकशीसाठी कळमनुरी तालुक्यात सात गावांमधून झालेल्या कामांचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, रोपवन नोंदवही यासह इतर कागदपत्रे सादर करण्याबाबत सामाजिक वनीकरण विभागाला कळविण्यात आले होते. मात्र या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयाने तब्बल पाच वेळा पत्र देऊन देखील वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यात आलेच नाहीत.

या (Kalamanuri Forestry Division) प्रकारामुळे चौकशीला मोठा अडथळा निर्माण झाला असून अभिलेखे नसल्याने चौकशी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उलट वनीकरण विभागानेच उपविभागाला पत्र देऊन तक्रारदार यांनी केलेल्या अर्जात कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे सांगत तक्रार निकाली काढण्याबाबत कळविले आहे. वनीकरण विभागाने चौकशी पथकाला दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनले आहे.

या (Kalamanuri Forestry Division) प्रकारामुळे उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला असून त्यात वारंवारपत्र देऊन देखील सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे दिली जात नसल्यान ं चौकशीसाठी उशीर होत आहे. त्यामुळे या प्रकरणात आपल्यास्तरावरून कार्यवाही करावी असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागाची भुमीका चौकशी दडपण्याची असून या संदर्भात आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: