ठाणे येथील मराठी साहित्य मंडळ व माय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोहा येथे पहिल्या 'अक्षरलेणं साहित्य संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड (Kala Bhushan Award) : ठाणे येथील मराठी साहित्य मंडळ व माय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोहा येथे पहिल्या 'अक्षरलेणं साहित्य संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात नांदेडचे सुपूत्र आणि आंतरराष्ट्रीय योगपटू किशन भवर यांना त्यांच्या योगा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 'कला भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर,प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड आणि प्रख्यात कवी देविदास फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते किशन भवर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या आनंददायी प्रसंगी आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे, योग शिक्षक राघव दंडे, विजय गोविंदवाड, माधवराव पाटील, वामन घन, हरिदास भवर आणि मिनाबाई जाधव यांची विशेष उपस्थिती होती.योगाच्या माध्यमातून जिल्ह्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या किशन भवर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे योग क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भवर यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजन आणि हितचिंतकांना दिले आहे.