Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

सोमठाणा जिल्हा परिषद शाळा

जि.प. शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या; दोन वर्षांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Somthana Zilla Parishad School: चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना, सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी


जिप शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या दोन वर्षांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Somthana Zilla Parishad School |

 

सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला; दोन वर्ग एका खोलीत भरवण्याची वेळ, नवीन इमारतीची ग्रामस्थांची मागणी

चिखली (Somthana Zilla Parishad School) : चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र शाळा सुरू असती तर गंभीर दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सोमठाणा गावात इयत्ता सातवीपर्यंत (Somthana Zilla Parishad School) जिल्हा परिषद शाळा आहे. २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शाळेच्या एका वर्गखोलीवरील टीनपत्रे उडाली होती. त्यानंतर भिंतींमध्ये सतत पाणी मुरत असल्याने इमारत धोकादायक बनली होती. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रथम एका वर्गखोलीची भिंत कोसळली, त्यानंतर शेजारील दुसऱ्या वर्गखोलीची भिंतही कोसळून दोन्ही खोल्यांचे मोठे नुकसान झाले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, २०२४ पासून शाळेची इमारत धोकादायक असल्याबाबत (Somthana Zilla Parishad School) जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दुर्घटनेत शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. दोन वर्गखोल्या कोसळल्याने आता दोन वर्गांना एका खोलीत बसवून शिक्षण द्यावे लागत असून विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पालक व ग्रामस्थांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे तसेच शाळेच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने सोमठाणा जिल्हा परिषद शाळेसाठी तातडीने नवीन इमारतीस मंजुरी देऊन सुरक्षित शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.