Breaking News
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!
  • मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
  • बीड नगरपालिकेत राडा! मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी, घटना CCTV मध्ये कैद
  • दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली!
  • निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • सिंधुदुर्ग मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम; १५ वाहनं जप्त
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत
  • रत्नागिरी RTO ने 2025–26 मध्ये ₹128.54 कोटींचा विक्रमी महसूल जमा; शासनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जवळा पांचाळ भीषण अपघात

जवळा पांचाळ येथे वाळूचा भरधाव टिप्पर पुलावरून खाली कोसळून अपघात

javala Panchal Accident: जवळा पांचाळ येथे भरधाव वेगाने जाणार्‍या वाळूच्या टिप्परचा पुलावरून खाली कोसळून अपघात. चालक गंभीर जखमी, नांदेड येथे उपचार सुरू.


जवळा पांचाळ येथे वाळूचा भरधाव टिप्पर पुलावरून खाली कोसळून अपघात

javala Panchal Accident |

अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी

हिंगोली (javala Panchal Accident) : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे दिनांक १३ एप्रिल सोमवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्‍या एमएच १२ इक्यू ०३७१ या क्रमांकाच्या वाळूच्या टिप्परचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये (javala Panchal Accident) गाडी चालकाला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारास नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. जवळा पांचाळ सह परिसरात सध्या वाळूचे टिप्पर भर दिवसा भरधाव वेगाने धावत आहे.

या वाळू माफीयांना कोणाचाच धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. डोंगरकडाहुन रेडगाव मार्गे जाणार्‍या वाळूचा  एमएच १२ इ क्यू ०३७१ या क्रमांकाचा  भरधाव वेगाने वाहणारा टिप्पर जवळा पांचाळ येथे आल्याने बस स्टॅन्ड ठिकाणी ड्रायव्हरच्या गाडीचा ताबा सुटला व वाळूचा टिप्पर थेट पुलाचे कठळे तोडून पुलावरून खाली  कोसळला गाडी चालक आत्माराम शंकरराव देवकते  यांना जबर मार लागला असून  गंभीर मार लागला  असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच जमादार संतोष नागरगोजे व विठ्ठल जाधव यांनी पाहणी केली.

जवळा पांचाळ (javala Panchal Accident) येथे नेहमीप्रमाणे मारुती शिवराम इंगळे यांच्या पाणीपुरीचा गाळा बस स्टॅन्ड येथे लिंबाच्या झाडाखाली लागलेला होता त्या गाड्याजवळ जवळपास पाच ते साहा माणसे उभी होती डोंगरकड्याहुन भरधाव वेगाने येणार्‍या वाळूचे टिप्पर मारुती इंगळे यांच्या पाणीपुरीचा गाळ्याला टिप्पर चा कट बसला व गाळ्यातील सगळं सामान खाली पळले सामानाचे नुकसान झाले व मारुती इंगळे यांच्याही पायाला  दुखापत झाली. सोबत पाच ते सहा माणसे उभे होते भरधाव वेगाने वाहणार्‍या टिप्पराला बघून माणसे पळाली व मोठा अनर्थ टळला. काही वर्षांपूर्वी सालापूर पाटी ते डोंगरकडा रस्त्याचे काम करण्यात आले या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते जवळा पांचाळ येथे अरुंद पूल बांधण्यात आले यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण जात आहे तसेच गांवाच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालनारे टिपर वाहनांना आळा घालने गरजेचे आहे.

Related to this topic: