Jaljeevan Mission Yojana: बळसोंड ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत सोमवारी पाणीपुरवठा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थांनी जलक्रांती पॅनल व सरपंच यांचे आभार मानले.
जलक्रांती पॅनलने निवडणुकीत दिलेले आश्वासन केले पूर्ण
पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
हिंगोली (Jaljeevan Mission Yojana) : बळसोंड भागामध्ये मागील अनेक वर्षापासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. मागील निवडणुकीत जलक्रांती पॅनलने पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत कामे करून आश्वासनाची पूर्ती करण्यात आली या भागात जन जीवन मिशन योजनेअंतर्गत सोमवारी पाणीपुरवठा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
हिंगोली जवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये (Jaljeevan Mission Yojana) जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ 11 मे रोजी उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी जलक्रांती पॅनल प्रमुख पप्पू चव्हाण, सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने गावात जलजीवन मिशन योजनेचे पाणी पोहोचले आहे.
जल क्रांती पॅनलने निवडणूक दरम्यान नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करत गावात पाणी आणून दाखवले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बळसोंड गावात सुरू झालेल्या या योजनेमुळे मुळगावापर्यंत पाणी पोहोचले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नवीन रस्त्याच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या (Jaljeevan Mission Yojana) योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी जलक्रांती पॅनल प्रमुख पप्पू उर्फ संभाजी सुरेश चव्हाण सरपंच शैलेश जैस्वाल, उपसरपंच ताराबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कान्होजी थोरात, लक्ष्मण शिंदे, नवनाथ शिखरे, डॉक्टर ज्ञानेश्वर पावडे, सुमित घिके, जयदेव माने, सुमित वाकडे, विनोद बांगर, सुमनबाई सोमटकर, उज्वला खोलगाडगे, अमित राटनालू यांचे आभार व्यक्त केले.