Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जलजीवन मिशन

जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करा; टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था ठेवा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Jaljeevan Mission: हिंगोलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित केली गेली, ज्यात जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.


जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करा टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था ठेवा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Jaljeevan Mission |

हिंगोली (Jaljeevan Mission) : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता तसेच सर्व तालुक्यांचे उपअभियंता उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांचा (Jaljeevan Mission) सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ६३१ योजना मंजूर असून त्यापैकी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या ६१९ तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १२ योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ३९२ योजनांद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

उन्हाळ्याच्या टंचाई काळात नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन प्रलंबित आहेत, ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून स्टँडपोस्ट व इतर माध्यमांतून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पेडगाव वाडी, पाणबुडी, लोहगाव, नरसी ना., पहेणी, सिंगी नागा, चिखली, चोंडी शहापूर, बळसोंड व केसापूर येथील प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

तसेच ज्या गावांमध्ये विहीर व पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागा अधिग्रहणाची प्रकरणे प्रलंबित आहेत, ती तत्काळ निकाली काढावीत. टँकर प्रस्तावित गावांना जलजीवन मिशन व इतर योजनांच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
 

Related to this topic: