Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

जल मिशन योजना

शेलगावमध्ये जल मिशन योजना व अन्य मागण्यांसाठी निवेदन

Jal Mission Yojana: रिसोडमधील शेलगाव गावात जल मिशन अंतर्गत नळ योजना सुरू करण्याची आणि अतिक्रमण हटविण्याची मागणी केली गेली आहे.


शेलगावमध्ये जल मिशन योजना व अन्य मागण्यांसाठी निवेदन

Jal Mission Yojana |

रिसोड (Jal Mission Yojana) : मौजे शेलगाव राजगुरे येथील जल मिशन अंतर्गत बंद असलेली नळ योजना सुरू करा, गावठाण हद्दीतील गट क्र. 231 मधील 0.31 आर जमीन गावाच्या स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढा, गावातील जिल्हा परिषद शाळे भोवती झालेले अतिक्रमण काढावे.अशि मागणी भागवतराव कृष्णराव वाघ व  ग्रामस्थ गावकरी मंडळी शेलगाव राजगुरे ता. रिसोड जि. वाशिम यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांना दिनांक 12 मे रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे शेलगाव (रा) येथे जल मिशन अंतर्गत नळ योजना राबविण्यात आली होती. सदर (Jal Mission Yojana) योजने अंतर्गत गावात नळ जोडण्यात आले. काही ठिकाणी जोडण्याचे राहिले आहे. जल मिशन अंतर्गत धरणावर विहीर ही खोदण्यात आली आहे. विहिरीला पाणी आहे परंतु सदर विहिरीतील पाणी आजपर्यंत गावात आले नाही. त्यामुळे जल मिशन मध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आल्याचे दिसून येते. त्यामुळे गावात पाणी आलेच नाही.

या विषयावर तात्काळ लक्ष घालून सदरची नळ योजना चालू करण्याचे आदेश द्यावेत गावठाण हद्दीतील क्षेत्र गट नं. 231 मधील 0.31 आर जमीन गावाच्या स्मशानभूमीसाठी राखीव ठेवली होती. परंतु सदर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.तरी सदर जमिनीवरील अतिक्रमण काढून जमीन मोकळी करून द्यावी म्हणजे तिथे स्मशानभूमीचे शेड बांधता येईल व गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सुटेल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर असंख्य गावकरी मंडळींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related to this topic: