Suicidal Farmer Family: जयपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश
सेनगाव (Suicidal Farmer Family) : तालुक्यातील मौजे जयपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता प्रल्हाद पायघन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी अॅड. निलेश हेलोंडे पाटील (अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा) यांनी भेट दिली. या प्रसंगी प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी ऋषीकेश होळकर, यांच्या सह पशुवैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अॅड. हेलोंडे पाटील यांनी पायघन कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच (Suicidal Farmer Family) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. या भेटीदरम्यान प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेत, प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय मदत लवकरात लवकर पोहोचविण्याची ग्वाही दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या तत्परतेमुळे कुटुंबाला काहीसा आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.