Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लोखंडी वाहनाची सफर

७४ चाकांच्या 'लोखंडी अजगर' वाहनाची चित्तवेधक सफर

Highway Vehicle Journey: खानापूर ते चिता येथे दिसलेला ७४ चाकांचा महाकाय वाहन, जो 2000 टन वजन उचलू शकतो, त्याची पाच दिवसांची संथ गतीने प्रवास सुरू आहे.


७४ चाकांच्या लोखंडी अजगर वाहनाची चित्तवेधक सफर

Highway Vehicle Journey |

रस्त्यावर अवतरलेला 'लोखंडी अजगर', ७४ चाकांच्या महाकाय वाहनाची चित्तवेधक सफर

खानापूर/चिता (Highway Vehicle Journey) : विज्ञानाने आणि अभियांत्रिकीने आज मानवाने कल्पनेच्या पलीकडे प्रगती केली आहे.याचा जिवंत अनुभव ३० मार्च रोजी रात्री  खानापूर-चिता परिसरातील नागरिक घेतला आहे. त्याचे झाले असे की, अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर एकूण ७४ चाके असलेले ३  अवजड वाहने खानापूर चित्ता येथील राष्ट्रीय महामार्गावर पहावयास मिळाले. रस्ते वाहतुकीच्या इतिहासातील एक अद्भूत आश्चर्य म्हणून ओळखले जाणारे, तब्बल ७४ चाके असलेले एक नाही दोन नाही तर तीन महाकाय वाहन  ३१ मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावरून  संथ गतीने मार्गस्थ झाले आहे. हे केवळ एक वाहन नसून, रस्त्यावर धावणारा जणू एक 'लोखंडी अजस्त्र राक्षस' वाटतो.

या वाहनाची भव्यता पाहून कोणाचेही डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या (Highway Vehicle Journey) वाहनाला ७४ चाके आहेत, त्याची ताकद किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. या वाहनाची वजन पेलण्याची क्षमता तब्बल २००० टन इतकी प्रचंड आहे. अवजड कारखान्यातील मोठी यंत्रसामग्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी या विशेष 'ट्रेलर'चा वापर केला जातो. जमिनीवर समांतर पसरलेली ही ७४ चाके आणि त्यावरील अजस्त्र भार पाहताना मानवी बुद्धिमत्तेचे कौतुक वाटते. पाच दिवसांचा प्रवास आणि संथ गती हा प्रवास आहे. 

नवाबांच्या हैदराबाद शहरातून ते उद्योगांच्या गुजरात राज्यापर्यंत हा प्रवास असुन हैदराबादहून निघालेल्या या वाहनाला आज पाच दिवस पूर्ण झाले आहेत. वाहनाचा अवाढव्य आकार आणि वजनामुळे त्याचा वेग मर्यादित आहे. हे वाहन दिवसाकाठी केवळ ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करू शकते. काल रात्री या वाहनाने खानापूर-चिता येथे आपला पाचवा मुक्काम ठोकला होता.

हे (Highway Vehicle Journey) वाहन ज्या ज्या भागातून जाते, तिथे जणू जत्राच भरते. काल खानापुर चित्तातही  हेच चित्र पाहायला मिळाले. रस्ते वळवताना होणारी कसरत, पुलावरून जाताना घेतली जाणारी काळजी आणि विजेच्या तारा सांभाळत चाललेली ही कसरत पाहण्यासारखी असते. रस्ते वाहतुकीत इतकी चाके असलेले वाहन यापूर्वी कधीही पाहिले नसल्याने, स्थानिक नागरिकांनी हे 'नवल' पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या वाहनासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

हैदराबाद ते गुजरात असा लांबचा पल्ला गाठण्यासाठी निघालेला हा 'लोखंडी प्रवास' अजून बराच काळ चालणार आहे. रोजचे ४०-५० किलोमीटरचे उद्दिष्ट गाठत, हे वाहन तंत्रज्ञानाची नवी उंची गाठत आहे. खानापूरकरांसाठी मात्र हा पाचवा मुक्काम एक अविस्मरणीय आणि आगळावेगळा अनुभव ठरला आहे.

Related to this topic: