Congress Yuva Morcha: कोरची तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने काँग्रेसच्या वनवासी शब्दाविरोधात तीव्र प्रतिउत्तर दिला. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी ने आरोप केले की काँग्रेस राजकीय
कोरची (Congress Yuva Morcha) : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 'वनवासी' शब्दाचा वापर केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने कुरखेडा येथे नुकताच एक तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला व काँग्रेसच्या भूमिकेला कोरची तालुक्याचे भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी कडाडून विरोध केला असून काँग्रेसवर दुटूपणाचा आरोप करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसचा कांगावा: विनोद कोरेटी
यावेळी बोलताना युवा मोर्चा (Congress Yuva Morcha) तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी म्हणाले की, "वनवासी या शब्दाचा अर्थ जंगलात राहणारे असा होतो. काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची दिशाभूल करत असून, राजकीय स्वार्थासाठी या मुद्द्यावरून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचा खरा विकास आणि सन्मान होत असून, काँग्रेस केवळ मतांच्या राजकारणासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे."आदिवासी समाजाच्या सन्मानाचा मुद्दाभारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिउत्तरामध्ये, काँग्रेसने आदिवासीबहुल भागात केलेल्या कथित दुर्लक्षाची आठवण करून देण्यात आली.
केंद्रातील भाजप सरकारने नेहमीच आदिवासी संस्कृती आणि परंपरांचा यथोचित सन्मान केला आहे, असे सांगत कोरेटी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनाला आदिवासी विरोधी मानसिकतेचे प्रदर्शन म्हटले आहे.स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग काँग्रेसच्या या आंदोलनाला शह देण्यासाठी कोरची व कुरखेडा परिसरातील भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, येत्या काळात काँग्रेसच्या या भूमिकेविरोधात स्थानिक पातळीवर जनजागृती करणार असल्याचे युवा मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.