Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आदिवासी नेते मुकेश नरोटे

कुरखेडा मोर्चावर आदिवासी नेते मुकेश नरोटे यांचे गंभीर आरोप; राजकीय वादाला उधाण

Tribal leader Mukesh Narote: आदिवासी नेते मुकेश नरोटे यांनी कुरखेडा येथे होणाऱ्या आदिवासी हक्कांसाठी होणाऱ्या मोर्चावरील आरोप करून राजकीय वादाला नवे स्वरूप देण्यात आले.


कुरखेडा मोर्चावर आदिवासी नेते मुकेश नरोटे यांचे गंभीर आरोप राजकीय वादाला उधाण

Tribal leader Mukesh Narote |

कोरची (Tribal leader Mukesh Narote) : कुरखेडा येथे जाहीर करण्यात आलेल्या “जल, जंगल, जमीन” व विविध मागण्यांसाठीच्या मोर्चावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आदिवासी नेते मुकेश नरोटे यांनी या आंदोलनावर थेट आरोप करत वादाला नवे वळण दिले आहे.

मुकेश नरोटे (Tribal leader Mukesh Narote) यांनी म्हटले आहे की, हा मोर्चा खऱ्या अर्थाने आदिवासी हक्कांसाठी नसून काही राजकीय नेते आदिवासींच्या नावावर राजकारण करत आहेत. “गेल्या अनेक वर्षांत आदिवासी भागात मूलभूत सुविधा—पाणी, रस्ते, रोजगार, शेती विकास—पुरेशा प्रमाणात दिल्या गेल्या नाहीत. आता त्याच मुद्द्यांवर आंदोलन करून जनतेची दिशाभूल केली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच त्यांनी पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनहक्क, रोजगार निर्मिती, तसेच पूर्वीच्या कथित भरती प्रक्रियांतील गैरव्यवहार या मुद्द्यांवरही संबंधितांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली. “आदिवासींच्या अस्मितेचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नरोटे (Tribal leader Mukesh Narote) यांनी पुढे असा दावाही केला की, या मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि अनेक आदिवासी बांधवांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या मते, खऱ्या विकासाच्या मुद्द्यांवर ठोस काम न करता केवळ आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, मोर्चाचे आयोजक आणि समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, हा लढा पूर्णपणे आदिवासी हक्क आणि विकासासाठी असल्याचे सांगितले आहे. “समाज एकत्र आणून हक्क मिळवण्यासाठी हा संघर्ष आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे कुरखेडा परिसरात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, आदिवासी विकासाचे प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.