Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली नगर परिषद

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे नगर परिषदेला निवेदन

Chikhli Nagar Parishad: भटक्या, हिंस्त्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बुलढाणा यांनी चिखली नगर परिषदेकडे निवेदन सादर केले.


भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे नगर परिषदेला निवेदन

Chikhli Nagar Parishad |


नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक, हेल्पलाईन व नसबंदी मोहीम राबविण्याची मागणी

चिखली (Chikhli Nagar Parishad) : शहरात भटक्या, हिंस्त्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत असल्याचा आरोप करत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बुलढाणा यांनी चिखली नगर परिषदेकडे निवेदन सादर केले. या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सोसायटीचे संचालक सुनील धंदर पाटील यांनी आरोग्य सभापती व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, शाळा, रुग्णालय परिसर तसेच निवासी भागात भटक्या कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचे नमूद केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचा पाठलाग केल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात केंद्र सरकारच्या 'पशुजन्म नियंत्रण नियम, २०२३' तसेच महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करून स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, (Chikhli Nagar Parishad) चिखली नगर परिषदेकडून याबाबत प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीने शहरासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी श्वान नियंत्रण पथक नियुक्त करणे, नागरिकांसाठी २४ तास तक्रार हेल्पलाईन सुरू करणे, सर्व प्रभागांमध्ये विशेष नसबंदी व लसीकरण मोहीम राबविणे तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना तातडीने पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पुढील ४८ तासांत सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात या समस्येमुळे कोणतीही जीवितहानी अथवा अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी (Chikhli Nagar Parishad) नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद चिखली यांनाही देण्यात आली आहे.