Manora Shut Down: मानोरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकर समावेशी संघटनांनी आमंत्रण दिले असून शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यावर ठरवले
मानोरा (Manora Shut Down) : दिल्लीतील जंतर - मंतर येथे २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आणि सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवार (दि. २३) जुलै रोजी मानोरा शहर बंदचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर मानोरा तालुक्यातही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध आंबेडकरी व समविचारी संघटनांसह या बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मानोरा तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या बंद आंदोलनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, भीम आर्मी, रिपब्लिकन सेना, तसेच विविध आंबेडकरी विचारांच्या सामाजिक, राजकीय व समविचारी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक, व्यापारी, युवक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी झाले होते.
तसेच (Manora Shut Down) आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने यशस्वी करण्यात आले, दरम्यान, विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी संघटना यांनी बंदला पाठिंबा जाहीर केल्यामुळे मानोरा तालुक्यातील आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने पार पडले. विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. शहरात कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलिसांनी कडेकोट चोख बंदोबस्त ठेवला होता.