Vanamahotsav 2026: पर्यावरणपूरक, दीर्घायुषी व भारतीय प्रजातींच्या वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, बेल, उंबर, आंबा, करंज, लिंब आदी पवित्र व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्ष
कळमनुरी (Vanamahotsav 2026) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वृक्षलागवडीला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने वनमहोत्सव २०२६ अंतर्गत कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी तसेच शासकीय वैद्यकीय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेचा जिल्ह्यातील शुभारंभ आमदार संतोष बांगर यांचे हस्ते करण्यात आला.
या (Vanamahotsav 2026) कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पर्यावरणपूरक, दीर्घायुषी व भारतीय प्रजातींच्या वृक्षांच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, बेल, उंबर, आंबा, करंज, लिंब आदी पवित्र व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह जिल्हा युवासेना प्रमुख रामभाऊ कदम, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, गजानन पाटील, कैलास पारवे संदीप बांगर, मयूर शिंदे, शैलेश उबाळे, संतोष वेरुळकर, ॲड. विश्वनाथ चौधरी, संतोष खर्जुले, अतुल बुर्से, अनिल बुर्से, अनिल शहू, कैलास पवार आदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
कार्यक्रमात केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संवर्धन व जतनाचा संकल्पही करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कटके (कळमनुरी), संदीप शिंदे (हिंगोली), वनपाल बबन गायकवाड, रितेश भेराणे, वनरक्षक सुधाकर चोपडे, राजू कोटकर, पूजा अंभोरे, सविता फड, वनमजूर बळीराम मंदाडे, मझर खान यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सैनिक शाळेतील शिक्षक-विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे (Vanamahotsav 2026) विशेष आकर्षण म्हणून "एक पेड माँ के नाम" सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथे सेल्फी काढून वृक्षलागवडीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या संतवचनाची आठवण करून देत असोलवाडी व शासकीय वैद्यकीय परिसरात झालेली वृक्षलागवड संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच वनमहोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.