ऑपरेशन क्रेक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो शस्त्रसाठा जप्त केला आहे.
नांदेड (Illegal Weapons) : ऑपरेशन क्रेक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये तलवारी व खंजरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी शस्त्रसाठाविरोधी मोहीम राबविण्यासाठी ऑपरेशन ब्रेक डाऊन मोहीम सुरू केली आहे. या मोहीम अंतर्गत नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाला अवैध शस्त्रसाठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहिती अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण ठाण्याच्या पथकाने बुधवारी रात्री मोठी कारवाई केली.या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये शेकडो तलवारी वl, खंजर, चाकू , गुप्ती असा एकूण ४३ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या ४ हजार ७९६ शस्त्रांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात येऊन शस्त्रसाठा संदर्भात पाहणी करत माहिती दिली.