Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली अवैध पान कारवाई

हिंगोली शहरातील 11 अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Hingoli illegal Tobacco: तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरातील अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई


हिंगोली शहरातील 11 अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Hingoli illegal Tobacco |

कोटपा कायद्या अंतर्गत 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल
जिल्हाभर मोहीम सुरूच राहणार

हिंगोली (Hingoli illegal Tobacco) : जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरातील अवैध पान टपऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील नारायण नगर, खटकाळी बायपास, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पोस्ट ऑफिस रोड परिसरातील अवैध पान टपऱ्यांची तपासणी केली.

या कारवाई दरम्यान 11 पान टपऱ्यांवर कोटपा कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 5 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस व आरोग्य विभागाने संयुक्तरित्या केली. पोलीस विभागातर्फे पोलीस हवालदार शेख मोहसीन व पोलीस शिपाई भूषण जोगे यांनी सहभाग घेतला. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्यासह कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) तसेच मराठा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड उपस्थित होते.

तंबाखूजन्य पदार्थांच्या (Hingoli illegal Tobacco) अनधिकृत विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी आणि कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध जिल्हाभरात दंडात्मक कारवाईची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.