Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून येताना तहसीलदारांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

खांबाळा येथील लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून हिंगोलीकडे परतत असताना तहसीलदार श्रीकांत रमेश भुजबळ व त्यांच्या पथकाने दि. २७ एप्रिल रोजी पळशी रोडवर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर रंगेहाथ पकडला.


लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून येताना तहसीलदारांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Illegal Sand Mining |

अवैध रेती व टिप्परसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त; हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली (Illegal Sand Mining) : तालुक्यातील खांबाळा येथील लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून हिंगोलीकडे परतत असताना तहसीलदार श्रीकांत रमेश भुजबळ व त्यांच्या पथकाने दि. २७ एप्रिल रोजी पळशी रोडवर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर रंगेहाथ पकडला. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा हायवा टिप्पर व सुमारे तीन ब्रास रेती जप्त करण्यात आली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे सोमवार, दि. २७ एप्रिल रोजी ईडोळीचे ग्राम महसूल अधिकारी विनोद ठाकरे यांच्या समवेत खांबाळा येथील लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून सायंकाळी सुमारे ५ ते ५:३० वाजेच्या दरम्यान हिंगोलीकडे येत होते. खुशालनगर, अंबिका कमान, पळशी रोड परिसरात त्यांना एमएच ३८ डी ९१७७ क्रमांकाचा भारत बेंझ कंपनीचा पिवळा टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसला. तहसीलदार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहन थांबवून तपासणी केली.

चौकशीदरम्यान टिप्पर चालक सचिन दिलीप सरकटे (वय २९, रा. साबलखेडा ता. सेनगाव) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना आढळून आला नाही. वाहनात अंदाजे तीन ब्रास रेती होती. रेती कोठून आणली व कुठे नेत आहे, याबाबत चालकाने समाधानकारक माहिती दिली नाही. तसेच वाहन मालकाचे नावही तो सांगू शकला नाही.

अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्री झाल्याने तहसीलदार भुजबळ यांनी पथकाच्या मदतीने टिप्पर व चालकाला ताब्यात घेतले. वाहन थेट हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी होऊन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी रात्री ९:०८ वाजता लेखी तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री ९:१७ वाजता गु.र.क्र. ०२७९ नोंदवला. आरोपी सचिन सरकटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७) व ४८(८) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त टिप्परची किंमत १५ लाख रुपये तर रेतीची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मोहमद अहमद शेख करीत आहेत. तहसीलदार भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीत पथकातील कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख नसला तरी पथकाच्या सतर्कतेमुळेच ही कारवाई यशस्वी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: