Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > कोकण

LED मासेमारी करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक; नौका जप्त

जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास LED च्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे.


led मासेमारी करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक नौका जप्त

Illegal Fishing |

(Illegal Fishing) जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास LED च्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सागरी भागात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात अनधिकृत मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत जयगड ते दाभोळ या विस्तीर्ण किनारपट्टीवर विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाया करत अवैध LED मासेमारी करणाऱ्या नौकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

‘मिडनाईट हंट’ची कारवाई :
जयगड बंदर परिसरात मध्यरात्री मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकून समुद्रात LED चा वापर करून मासेमारी करणाऱ्या तीन नौकांना रंगेहाथ पकडले. अंधार आणि उग्र समुद्री परिस्थितीचा फायदा घेत सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारावर विभागाने प्रभावी कारवाई केली.

३ एप्रिल रोजी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना “भराडी प्रसन्न” ही नौका LED उपकरणांसह जप्त करण्यात आली होती. त्यानंतर ७ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजता गुहागर-दाभोळ परिसरात पुन्हा कारवाई करत “सफा मरवा-१” ही नौका अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. सदर नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त अवस्थेत ठेवण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या सर्व नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारित अध्यादेश २०२१ अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रकरणे पुढील निर्णयासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सागरी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी ‘ऑपरेशन क्लीन-सी’ मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

Related to this topic: