Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर बांधकाम प्रकरण

लातूरमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी तिघा बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल

Latur construction case: लातूरमधील अनधिकृत बांधकामावर तिघा बिल्डरांच्या विरोधात फिर्यादीच्या आधारावर गुन्हेच्या दाखलाची मागणी महापालिकेकडून केली जात आहे.


लातूरमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी तिघा बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल 

Latur construction case |

लातूर (Latur construction case) : लातूर शहरातील मंत्री नगर भागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघा बिल्डरांच्या विरोधात महापालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या बी झोनचे क्षेत्रीय अधिकारी प्रतिक मुसाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी  शिवाजीनगर पोलिसांत किरण लक्ष्मीनारायण मंत्री व शिवप्रसाद श्रीनिवास मालू या दोघांविरूद्ध एक गुन्हा आणि परवानगी दिल्यापेक्षा अधिकचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी भिक्कन शब्बरी अली हन्नूरे (सर्व राहणार मंत्री नगर, सूत मील रोड लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगररचना विभागाच्या प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमांचे अनुपालन न करता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जे बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे आहे, म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्या टोलेजंग इमारती रंगरंगोटीसह आज पूर्ण आहेत.

महापालिकेने दुर्लक्ष का केले?

लातूर शहरात अनधिकृत बांधकाम प्रकरणी मनपाने तिघा बिल्डराविरूद्ध गुन्हे दाखल (Latur construction case) केले आहेत. कोणतेही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या बांधकामाला 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' दिले जाते. हे सर्टिफिकेट देताना महापालिकेचे अधिकारी काय करत होते? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शहरात इमारती बांधताना काही बिल्डरांनी नियमाची पायमल्ली केली आहे, त्याचे काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Related to this topic: