International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसावरील कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी सार्वजनिकांना नियमित योगासने करण्याचे आव्हान दिले. त्यांनी लहानपणापासून वयोवृद्धपर्यंत सर्वांसाठी योगा...
हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
हिंगोली (International Yoga Day) : आज जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने हिंगोली शहरातील निर्मल फिटनेस मध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार बांगर यांनी स्वतः उपस्थित राहून योगासने केली. कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार संतोष बांगर यांनी सर्व जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. "योगा हा कोणत्याही एका वयापुरता मर्यादित नसून, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने तो केला पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगा हाच उत्तम पर्याय आहे," असे ते म्हणाले.
नियमित योगासने केल्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. त्यामुळे केवळ आजच्या (International Yoga Day) दिवसापुरतेच मर्यादित न राहता, सर्व नागरिकांनी दररोज न चुकता योगा करावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी शहरातील नागरिक, तरुण वर्ग आणि जिममधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.