Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जागतिक क्लबफूट दिन

हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक क्लबफूट दिन’ उत्साहात

World Clubfoot Day: हिंगोली जिल्ह्यातील रुग्णालयात जन्मजात क्लबफूट (पाय आतला बाजूस वाकलेला) विकारासाठी संपूर्ण मोफत उपचार उपलब्ध केल्यात आले. विशेष पद्धतीने प्लास्टर आणि कॅलिपर वापरून पायांना सरळ


हिंगोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक क्लबफूट दिन’ उत्साहात

World Clubfoot Day |

हिंगोली (World Clubfoot Day) : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज ४ जून रोजी ‘जागतिक क्लबफूट दिन’ (World Clubfoot Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मजात दोन्ही किंवा एक पाय आतल्या बाजूला वळलेला असणे (क्लबफूट) या विकारावर जिल्हा रुग्णालयात संपूर्ण मोफत उपचार उपलब्ध असून, याद्वारे लहान मुलांच्या दिव्यांगत्वावर मात केली जात आहे, अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मजात पाय आतील बाजूस वाकलेल्या बालकांसाठी विशेष मोफत उपचार मोहीम राबवली जात आहे जागतिक दर्जाच्या पद्धतीचा वापर करून दर आठवड्याला बाळाच्या पायाला विशिष्ट प्लास्टर केले जाते, ज्यामुळे पाय हळूहळू सरळ होतात.

प्लास्टरचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर पाय पुन्हा वाकडे होऊ नयेत म्हणून दिले जाणारे विशेष कॅलिपर (World Clubfoot Day) आणि बूटही रुग्णालया मार्फत मोफत दिले जातात. हिंगोलीतील पालकांना मोठा दिलासा; दिव्यांगत्वाला मात, या मोहिमेमुळे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकांनी घाबरून न जाता पहिल्याच महिन्यात बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन यावे. बाळ जितके लहान, तितके त्याचे हाड लवचिक असते आणि उपचार जलद होतात.

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्याला दिव्यांगत्वापासून वाचवावे."जागतिक क्लबफूट दिनानिमित्त (World Clubfoot Day) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लहान बालकांना खेळणी, फुगे आणि खाऊचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. यावेळी कार्यक्रमास डॉ. दीपक मोरे, डॉ. स्नेहल नगरे, डॉ मनीष बगडिया, डॉ गहिलोत, परिचारिका टापरे सिस्टर खंडारे, बेडे कटके परदेशी समन्वयक world clubfoot प्रतिक्षा इंगोले, प्रीती साठे, सूर्यकांत राजुलवार, जितेंद्र भट उपस्थित होते.

Related to this topic: