Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना

Nationalist Congress: हिंगोलीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर शक्तीचा पर्व दाटला. अजित दादा पवारच्या गटाने पक्षात विस्तार केल्यामुळे शरदचंद्र पवार यांची जिल्हाध्यक्षाची नियुक्ती


राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना

Nationalist Congress |

हिंगोली (Nationalist Congress) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अनेक महिने उलटून गेले तरी अद्यापपर्यंत जिल्हाध्यक्ष मिळेनासा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी होती. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक मातब्बरांनी अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्कालिन जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह शेख निहाल भैय्या, शेख शकील, गणेश लुंगे, कयुमखाँ पठाण, आमेर अली, ॲड. अमित कळासरे, प्रा. सुखदेव बलखंडे, आरेफ लाला बागवान, बिरजू यादव यांनी नगर पालिका निवडणूकी पुर्वी अजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यापूर्वी अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष राजकुमार देशमुख, माजी उपाध्यक्ष कैलास देशमुख, संदिप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मातब्बर पदाधिकाऱ्यांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात गेल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. जिल्ह्यात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर वगळता इतर नाममात्र मातब्बर या पक्षात राहीले आहेत. त्यामुळे पोकळी निर्माण झालेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केंव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.