Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली हरीण वाचले

हिंगोली शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले

Hingoli Deer Rescue: कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस येथे २६ जून रोजी  हृदयस्पर्शी घटना घडली. शेतकरी गजाननराव पंतगे आपल्या शेतात हळदीची लागवड करीत असताना रानटी कुत्र्यांच्या एका कळपाने हरणाच्या पाडस


हिंगोली  शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले  

Hingoli Deer Rescue |

हिंगोली (Hingoli Deer Rescue) : कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस येथे २६ जून रोजी  हृदयस्पर्शी घटना घडली. शेतकरी गजाननराव पंतगे आपल्या शेतात हळदीची लागवड करीत असताना रानटी कुत्र्यांच्या एका कळपाने हरणाच्या पाडसावर हल्ला केला. मादी हरीण जीव वाचवून पळून गेले, मात्र पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. 

पेरणी करत असताना गजाननराव यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्रांच्या मदतीने धाव घेऊन पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवले. त्यानंतर त्यांनी तातडीने प्राणी मित्र रामप्रसाद जाधव यांना याबत कळवले. दिवसभर पाडसाची काळजी घेतल्यानंतर रात्री त्याला (Hingoli Deer Rescue) हरणाच्या कळपात सोडून देण्यात आले. गजाननराव यांच्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे पाडसाचे प्राण वाचले, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. 

याबाबत बोलताना प्राणी मित्र रामप्रसाद जाधव म्हणाले, "पावसाळा सुरू झाल्याने शेतात चिखल साचतो. हरणाच्या पाडसांच्या पायाला चिखलाचे गोळे चिकटल्याने त्यांना पळणे अवघड होते. त्यामुळे पाडसे व हरणे अनेकदा रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडतात. अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहून वन्यजीवांचे संरक्षण करावे."  कोंढुर डिग्रस येथील या घटनेने वन्यजीवांप्रती माणुसकीचे दर्शन घडवले आहे.