Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Human Trafficking

युरोपमध्ये नोकरीचे आमिष; नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा आरोप, आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या एका २८ वर्षीय महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


युरोपमध्ये नोकरीचे आमिष नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

Human Trafficking |

₹१.५ लाख पगाराचे आमिष दाखवून तब्बल ₹११ लाख उकळले; महिनाभर छळ सहन केल्यानंतर महिलेची सुटका

नागपूर : परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागपूरच्या एका २८ वर्षीय महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरातील कथित कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचा आरोप असून, पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर संबंधित महिलेला एका बिअर शॉपच्या मालकाकडे विकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. महिनाभर त्रास सहन केल्यानंतर महिलेने स्वतःची सुटका करून भारतात परतत पुणे पोलिसांकडे तक्रार केली.

नोकरीच्या शोधात असताना डिसेंबर २०२५ मध्ये या महिलेला इंस्टाग्रामवर पुण्यातील विमाननगर भागातील ‘वी मायग्रेट’ या कन्सल्टन्सीची माहिती मिळाली. एजन्सीशी संपर्क साधल्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअर म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरमहा ₹१.५ लाख पगार आणि दिवसाला केवळ ८ तास काम असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्यात आला.

परदेशातील नोकरीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रियांच्या नावाखाली महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ₹११ लाख रुपये घेण्यात आले. मात्र, पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिला अपेक्षित नोकरी देण्याऐवजी एका बिअर शॉपच्या मालकाकडे विकल्याचा आरोप आहे.

बिअर शॉपमध्ये तिच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात होते. महिलेने या प्रकाराला विरोध केला असता, संबंधित मालकाने भारतातील एजंट्सना पैसे देऊन तिला खरेदी केल्याचे सांगितल्याचा दावा महिलेने केला आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिलेने आपल्या पतीशी संपर्क साधून आपल्यासोबत फसवणूक झाल्याची माहिती दिली. पतीने तिला धीर देत तेथून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर सुमारे महिनाभर त्रास सहन केल्यानंतर महिलेने तेथून स्वतःची सुटका करून भारत गाठला. पुण्यात परतल्यानंतर तिने गुन्हे शाखेशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या प्रकरणी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात ८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा भाटी, अनिलकुमार, अजहर शेख, वामसी, चैतन्य, हिम्मत सिंग आणि कपिल मिश्रा अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासातून देश-विदेशातील तरुण-तरुणींना परदेशात विकणाऱ्या कथित आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटची माहिती समोर आली आहे. या टोळीतील चार सदस्य पुण्यातील तर चार सदस्य पोर्तुगालमधील असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांकडून या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा पुढील तपास सुरू असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Related to this topic: