Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव; H.S.C. निकालाची परंपरा कायम

सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय, भांडेगाव येथील इयत्ता बारावीचा निकाल यंदाही उल्लेखनीय लागला असून संस्थेची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात आली आहे.


सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव hsc निकालाची परंपरा कायम

HSC Results |

हिंगोली (HSC Results) : जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्था, हिंगोली द्वारा संचलित सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय, भांडेगाव येथील इयत्ता बारावीचा निकाल यंदाही उल्लेखनीय लागला असून संस्थेची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या H.S.C. परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल 99.60 टक्के, कला शाखेचा निकाल 96.15 टक्के तर एकूण निकाल 98.75 टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेत कु. अश्विनी गंगाधर शिंदे हिने 90.50 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. अथर्व भारत सारस्वत (83.33 टक्के) आणि कु. स्वाती भानुदास येवले (83.33 टक्के) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर कुमारी वैष्णवी भागवत हिने 83.17 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

कला शाखेत माळी पठाडे कविता दत्ता हिने 85.17 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. ओंकार मनोहर बंदुके (84.33 टक्के) द्वितीय तर कु. संगीता विठ्ठल शिंदे (83.67 टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

उत्तीर्ण व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री तानाजी मुटकुळे, सरचिटणीस श्री ग्यानदेवराव जगताप, कोषाध्यक्ष श्री दिलीपराव चव्हाण, उपाध्यक्ष श्री उत्तमरावजी जगताप, शाळा समितीचे अध्यक्ष तथा संचालक श्री संतोषराव जगताप, सहसरचिटणीस श्री प्रकाश निरगुडे, प्राचार्य गजानन वैद्य, प्राचार्य बाबासाहेब इंगोले, मुख्याध्यापक श्री वैजनाथ गाडे, मुख्याध्यापक श्री विशाल शिंदे तसेच भाजपा महिला नेत्या सौ. राजामती मुटकुळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी सरचिटणीस श्री ग्यानदेवराव जगताप आणि कोषाध्यक्ष श्री दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष जगताप सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य बाबासाहेब इंगोले यांनी मानले.

Related to this topic: