Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कोयाळी बु. परीक्षा केंद्रातून अथर्व देशमुख प्रथम

रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बु. परीक्षा केंद्रातून अथर्व वसंतराव देशमुख याने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.


श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कोयाळी बु परीक्षा केंद्रातून अथर्व देशमुख प्रथम

HSC Result News |

रिसोड (HSC Result News) : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज, २ मे रोजी जाहीर झाला असून रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बु. परीक्षा केंद्रातून अथर्व वसंतराव देशमुख याने विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याला ८८.१७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

या परीक्षा केंद्रामध्ये आसेगाव पेन येथील प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, कोयाळी बुद्रुक येथील विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांमधून अथर्व देशमुख याने प्रथम येत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

अथर्व देशमुख हा करडा, तालुका रिसोड येथील रहिवासी असून त्याच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या या यशाचे श्रेय अथर्वने आपल्या गुरुजन वर्गासोबतच आई-वडील आणि आजोबा यांना दिले आहे.

Related to this topic: