प्रभू श्रीरामचंद्र की जय, हर घर भगवा लहरा गया अश्या गगनभेदी घोषणा देत राम भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवीत राम जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा केला.
शहरात भव्य निघाली शोभायात्रा, ठिकठिकाणी आतिशबाजी!
मानोरा (Shobha Yatra): प्रभू श्रीरामचंद्र की जय, हर घर भगवा लहरा गया अश्या गगनभेदी घोषणा देत राम भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवीत राम जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संपूर्ण संपूर्ण नगरीच भगवामय झाल्याने मानोरा शहरात जणू अयोध्या नगरीत अवतरल्याचे दिसून येत होते.
रामनवमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्र यांच्या जन्मदिनाच्या पावन पर्वावर गुरुवारी दि. २६ मार्च रोजी आयोजित या मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्ताने विविधतेतून एकता या उक्तीप्रमाणे सर्व धर्म पंथाच्या बांधव मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. जुनी वस्ती हनुमान हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा करून शोभा यात्रा मिरवणुकीला सायंकाळी ६ वाजता ढोल तासा, डिजेच्या तालावर सुरुवात झाली. यावेळी सहभागी रामभक्तांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. तसेच भगवे दुपट्टे ध्वज यामुळे संपूर्ण शहर भगवामय बनला होता. श्रीरामाच्या शोभायत्रेसाठी भव्य असे आकर्षक रथ सजविण्यात आले होते.
शोभायात्रा मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दिग्रस चौकातून रामदेवबाबा मंदीर पर्यंत काढण्यात आली. रामदेवबाबा मंदिरात प्रभू श्रीरामाचे पूजा, आरती करून प्रसादाचे राम भक्ताना वितरण करण्यात आले. राम जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत विविध संघटना, सामाजिक संस्था व धार्मिक संघटनेच्या वतीने विविध आकर्षक झाकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्रीराम सेनेचा सहभाग होता. तसेच या शोभायात्रेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे राम हेडा, करण ठाकुर, अरविंद इंगोले, कृष्णा साखरकर, वेदांत तिवारी, गौरव पदमगिरवार, सौरव अनजाने, रोहन सूरजुसे, हर्ष ठाकुर, कार्तिक फाडके, रोहन भारसाकडे, विनय मंदिलकर, तन्मय सवंदले, ददू पदमगिरवार, शिवम खुराडे, शिवम शर्मा, आदित्य लवटे, सुजल सुरजूसे, गोपाल कुरकुटे, शिवम पदमगिरवार या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन मानोरा शहर भगवान करण्यासाठी परिश्रम घेतले. व शांतीपूर्व मिरवणूक काढून आरती केली.
आकर्षक झाकीने वेधले लक्ष!
शहरातील जुनी वस्ती मानो मानोरा येथील हनुमान मंदिरातून शोभा यात्रा काढण्यात आली. गणपती मंदिर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दिग्रस चौक मार्गाने रामदेवबाबा मंदिरापर्यंत रॅलीने भ्रमण केले. दरम्यान संपूर्ण शहर जय श्रीरामच्या जयघोषाने गजबजले होते. शोभायात्रेत आकर्षक झाकी, देखावे, वेशभूषा साकारलेले कलावंत वाजंत्रीच्या निनाद हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.